ज्‍येष्‍ठ शिवसेना नेते श्री. सुधीरजी जोशी यांना श्रध्‍दांजली

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

ज्‍येष्‍ठ शिवसेना नेते श्री. सुधीरजी जोशी यांचे आज दुःखद निधन झाले, त्‍याबद्दल लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तिव्र दुःख व्‍यक्‍त केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि सच्‍चे शिवसैनिक अशी त्‍यांची ओळख होती. वयाच्‍या ८१ व्‍या वर्षी राहत्‍या घरी त्‍यांचे निधन झालं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्‍थापना केल्‍यानंतर श्री. सुधीर जोशी यांनी शिवसेना वाढीसाठी बाळासाहेबांसोबत मोठं काम केलं. १९७२ मध्‍ये ते मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदार संघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपा-शिवसेना युती सरकारच्‍या कार्यकाळत त्‍यांनी महसुल व शिक्षण मंत्री म्‍हणून काम पाहिले होते.

आ. मुनगंटीवार यांनी स्‍व. सुधीर जोशींबद्दल आठवणी सांगताना त्‍यांच्‍या बरोबर युती शासनाच्‍या काळात मंत्री म्‍हणून काम केल्‍याचे सांगीतले. अतिशय मनमिळावू व निगर्वी व्‍यक्‍तीमत्‍वाचे श्री. सुधीर जोशी धनी होते, असेही आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले. मी त्‍यांच्‍या कुटूंबियांना या दुःखातुन सावरण्‍याची शक्‍ती परमेश्‍वर त्‍यांना देवो अशी प्रार्थना करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here