बोगस सदस्य नोंदणी टाळण्यासाठी उत्तर नागपूर काँग्रेसतर्फे डिजीटल प्रशिक्षण शिबिर

By 👉 Shankar Tadas

नागपूर: काँग्रेसला मानणाऱ्या खऱ्याखुऱ्या मतदारांनाच पक्षाचे सदस्यत्व मिळावे, या उद्देशाने उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने रवीभवन येथील सभागृहात काँग्रेसचे डिजीटल प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेसची सदस्य नोंदणी निवडणूक आयोगाच्या मतदारयादीशी जोडल्यामुळे मोबाईलवर ओटीपी प्राप्त होणाऱ्या मतदारांनाच पक्षाचे सदस्यत्व मिळणार आहे.
मिस्ड कॉल देऊन होणारी बोगस सदस्य नोंदणी टाळण्यासाठी आम्ही डिजीटल सदस्य नोंदणी सुरू केली असल्याची माहिती या मोहिमेचे प्रशिक्षक मनीष तिवारी यांनी दिली.
या शिबिरप्रसंगी माजी आमदार अशोक धवड, महापालिका विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, माजी नगरसेवक सुरेश जग्यासी यांच्यासह नागपूर शहरातील काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष आणि ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here