सावित्रीबाई फुले विद्यालयात स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती

By : Mohan Bharti

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालयात दिनांक १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद तसेच राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विवेकानंद व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची थोरवी सांगितली. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक नामदेव बावनकर, ज्योती चटप, विद्या शंभरकर इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन महेंद्रकुमार ताकसांडे तर आभार सुरेश पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी एन बोबडे, किनाके, आडे,भालचंद्र कोंगरे, वासेकर,आत्राम सुषमा चवरे, मांढरे इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here