प्रधानमंत्री मोदीजींच्या सुरक्षेत खुनी षडयंत्र रचणाऱ्या पंजाब सरकारचा भाजपा ओबीसी मोर्चाव्दारे मानवी श्रृंखलेव्दारे जिल्हाभर निषेध

By : Shivaji Selokar

चंद्रपूर – प्रधानमंत्राी मान. नरेंद्र मोदीजी यांच्या फिरोजपुर दौराप्रसंगी काॅंग्रेस नेतृत्वातील पंजाब सरकारने व्देषभावनेतून प्रधानमंत्रयांच्या सुरक्षेला छेद देत खुनी षडयंत्रा रचल्याने त्यांच्या जीवीताला धोका निर्माण झाला होता. या लाजीरवाण्या व अक्षम्य अपराधाची गंभीर दखल मान. सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा घेतली असून या संपूर्ण प्रकरणाच्या चैकशीकरीता समितीचे गठन करून चैकशीचे निर्देश दिले आहे. पंजाब सरकारच्या अशा संशयास्पद भूमिकेचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच भविष्यात अशा षडयंत्राकारी प्रकारावर आळा घालण्याकरीता भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर जिल्हा महानगर व्दारा मानवी श्रृंखला कार्यक्रमाचे आयोजन करून पंजाब सरकारच्या कृतीचा धिक्कार करण्यात आल्याचे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी केले.
भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने दि. 12 जानेवारी 2022 रोजी कोविड नियमांचे काटेकोर पालन करून जिल्ह्यातील तालुका, शहर व ग्रामिण स्तरावर मानवी श्रंृखलाव्दारे प्रधानमंत्रयांच्या सुरक्षेत षडयंत्रा करीत त्यांच्या जीवीताला धोका पोहोचविण्याची दुष्कृती करणाÚया पंजाब सरकारचा सर्वत्रा निषेध नोंदविण्यात आला. चंद्रपूर महानगरात ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर, ज्येष्ठ नेते विजय राऊत, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, पूर्व महापौर अंजली घोटेकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, पूर्व उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपा नेते राजेंद्र गांधी, स्थायी समिती अध्यक्ष संदीप आवारी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, ओबीसी मोर्चा महानगर जिल्हध्यक्ष विनोद शेरकी, देवानंद वाढई, बाळु कोतपल्लीवार, मोहन चैधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी चैक येथे पार पडलेल्या या निषेध, निदर्शने कार्यक्रमात पंजाब सरकारविरूध्द घोषणाबाजी व फलक झळकवून कार्यकत्र्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला.
चंद्रपूर महानगरातील जटपुरा गेट, बंगाली कॅम्प, तुकूम धांडे हाॅस्पीटल, बाबुपेठ नेताजी चैक येथे मंडळ स्तरावरही मानवी श्रृंखलेव्दारे पंजाब सरकारचा फलके झळकवून निषेध करण्यात आला. या कार्यक्रमास सर्वश्री सुर्यकांत कुचनवार, राजेंद्र खांडेकर, छबुताई वैरागडे, सोपान वायकर, नगरसेविका संगीता खांडेकर, शिलाताई चव्हाण, माया उईके, शितल आत्राम, प्रशांत चैधरी, शाम कनकम, संदीप किरमे, रवि जोगी, सुभाष कासनगोट्टुवार, वंदना संतोषवार, विठ्ठलराव डुकरे, संदीप आगलावे, दिनकर सोमलकर, रव िलोणकर, सचिन कोतपल्लीवार, मनोरंजन राॅय, शशिकांत मस्के, डाॅ. दिपक भट्टाचार्य, डाॅ. गिरीधर येडे, पुद्दटवार सर, सुभाष ढवस, पराग मलोडे, राजेश यादव, क्रिष्णा कुंडू, चंदन पाल, अरूण तिखे, राजु येले, बाळु कोलनकर, शैलेश इंगोले, सतीश आदमने, शाम बोबडे, संजय निखारे, मधुकर राऊत, रेणुका घोडेस्वार, स्वप्नील कांबळे, राजेश वाकोडे, गणेश रासपायले, चेतराम बोकडे, करण राहुकर, श्रीकांत भोयर, प्रमोद शास्त्राकार, राजु जोशी, रवि चहारे, मुकेश गाडगे, हिमांशु गादेवार, कुनाल गुंडावार, नंदु गन्नुरवार, कार्तीक मुसळे, नकुल आचार्य, किशोर कुडे, प्रलय सरकार, गणेश रामगुंडवार, वासुदेव गावंडे, मोहन मंचलवार, शिवम कपुर, अक्षय शेंडे, महेंद्र शिवनकर, आदीत्य डवरे यांचेसह भाजपा, भाजपा ओबीसी मोर्चा, भाजयुमो चे पदाधिकारी, कार्यकर्ते या निषेध निदर्शने कार्यक्रमात सहभागी झाले होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *