महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय च्या वतीने काढण्यात आली मतदार जनजागृती रॅली.                             

लोकदर्शन 👉मोहन भारती

गडचांदूर,,

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर च्या वतीने गडचांदूर शहरातून शनिवारी मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली,
महाविद्यालयातुन निघालेल्या रॅलीला हिरवी झेंडी मंडळ अधिकारी नारायण चव्हाण यांनी दाखवून रवाना केली ,याप्रसंगी प्राचार्या सौ,स्मिता चिताडे,पटवारी सोहेल अन्सारी,उपप्राचार्य विजय आकनूरवार,पर्यवेक्षक हनुमान मस्की, एम,सी,व्ही, सी,विभाग प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे, प्रा, प्रफुल्ल माहुरे तथा इतर उपस्थित होते,
शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत रॅली महाविद्यालयात पोहचल्यावर विसर्जित झाली, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले,30 नोव्हेंबर पर्यंत 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवकांनी मतदान नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले,
प्रास्ताविक प्रा, आशिष देरकर यांनी केले संचालन प्रा, प्रदीप परसुटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा, नंदा भोयर यांनी केले, रॅली मध्ये विद्यार्थी,तथा प्राध्यापक सहभागी झाले होते,रॅली च्या यशस्वी ते साठी अनिल येमुर्ले, लीलाधर काळे यांनी परिश्रम घेतले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here