कापूस पऱ्हाट्यापासून कांडीकोळसा !

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕कापसाच्या पऱ्हाट्यापासून तयार करा कांडीकोळसा

कापूस वेचणी झाल्यावर शेतकऱ्यांपुढील सर्वांत मोठा प्रश्‍न हा पऱ्हाट्यांचा असतो. अनेकजण या पऱ्हाट्या इंधन म्हणून वापरतात किंवा शेतात जाळून टाकतात. शेताच्या कडेला पऱ्हाट्या साठवल्या तर त्यावरील कीड व रोगाचा प्रादुर्भाव पुढील हंगामातील पिकामध्ये होऊ शकतो. अशा पऱ्हाट्यांपासून कांडीकोळसा तयार करून वाया जाणाऱ्या पऱ्हाट्यांवर उत्तर शोधता येते.

एका एकरामध्ये सहा क्विंटल पऱ्हाट्या मिळतात. या पऱ्हाट्या वापरून किमान चार ते पाच महिने कांडीकोळसा तयार करता येतो.

याव्यतिरिक्त इतर पिकांच्या काडीकचऱ्याचाही वापर करून वर्षभर कांडीकोळसा उद्योग चालवता येणे शक्‍य आहे.

कांडीकोळसा प्रक्रिया तंत्रज्ञान

भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेतील तज्ज्ञांनी शेतातील काडीकचरा वापरून कांडीकोळसा तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये कोळसा तयार करण्यासाठी लागणारी भट्टी तसेच कांडीकोळसा बनविण्याचे यंत्र आणि चूल तयार केली आहे.

कोळसा तयार करण्याची भट्टी :

ही एक लोखंडी पिंपासारखी भट्टी असून, तिला मधोमध एक झडप असते. कोळसा तयार करण्यासाठी यात पऱ्हाट्या बारीक करून आतमध्ये टाकतात. निम्म्यापेक्षा जास्त भरल्यावर तो पेटवून देऊन झडप बंद करतात.

त्यामुळे भट्टीत जितका ऑक्‍सिजन आहे, तोपर्यंत पऱ्हाट्या जळून कोळसा तयार होतो. म्हणजेच ऑक्‍सिजनचा अपुरा पुरवठा केला तर कोळसा तयार होतो. भट्टी पेटवल्यानंतर पाच तासांनी झडप उघडून कोळसा बाहेर काढावा.

——————

एकूण लांबी +1100 मि.मी.
एकूण व्यास +800 मि.मी.
क्षमता कि./दिवस +80 कि.ग्रॅ.
रूपांतर क्षमता +40 टक्के
मजूर +2

——————–

कांडी कोळसा तयार करण्याचे यंत्र :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here