सावलहिरा येथे गावकऱ्यांनी बांधला वनराई बंधारा

By : Mohan Bharti

गडचांदूर : कोरपना तालुक्यातील सावलहिरा येथे शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यमाने लोकसहभागातून नुकताच वनराई बंधारा बांधण्यात आला. भविष्यात पाण्याची पातळी खोल जाऊन पाणी टंचाई ला सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.त्यादृष्टीने शासनाच्या वतीने सूचना निर्गमित करण्यात आल्या त्यानुषंगाने वाहते पाणी अडवून जिरवण्यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मेहरबान राठोड,कैलाश म्हैसके,विलास किन्नाके, ग्रामसेवक सतीश मडावी, गोसाई अमोल गोसाई जगदीश कोवे,बळीराम पेंदोर,विकास कोवे, उमेश पेंदोर,संदीप नैताम अनिल वेलची, किशोर बहिरे तथा शाळाव्यवस्थापन समिती चे सदस्य व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here