जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे अमरावतीच्या 100 अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

by : Shankar Tadas

चंद्रपूर :

कोरपना :  जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान २०२३-२४ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सीईओसोबत 100 पदाधिकारी, अधिकारी, ग्रामसेवक व सरपंच मंडळींनी शुक्रवारी अभ्यास दौरा केला असून विविध उपक्रमांची पाहणी केली.
अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी महसुली विभागाबाहेर दर्शन ग्रामपंचायतीचा अभ्यास दौरा करण्यासंदर्भात अमरावती जिल्हा परिषदेची आराखड्यात तरतूद होती. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बिबी, आनंदवन, मंगी, राजगड, जुगनाळा व मोहुर्ली इत्यादी आदर्श व स्मार्ट गावात दौरा आयोजित करण्यात आला होता.
जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे विद्यापीठ आपल्या गावी, बांबू प्रकल्प, वनपंचायत, पाणी पुरवठा योजना, गावातील पायाभूत सुविधा व गावाशी संबंधित इतर गोष्टींचे अवलोकन केले. यावेळी अमरावती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्यासह १०० पदाधिकारी, अधिकारी, ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते. सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच आशिष देरकर, ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे यांच्यासह गावातील नागरिकांचा यावेळी मोठा सहभाग होता.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *