जिवती येथे २६ नोव्हेंबरला निशुल्क महाआरोग्य शिबीराचे आयोजन. : आ. सुभाष धोटेंनी घेतला आढावा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

जिवती (ता. प्र) :– आमदार सुभाnष धोटे मित्र परिवार आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने जिवती येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी होऊ घातलेल्या भव्य निशुल्क आरोग्य शिबीराच्या तयारीचा आढावा लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी पंचायत समिती, जिवती येथे घेतला. यावेळी त्यांनी उपस्थितीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण सुचना केल्या. तसेच जिवती तालुक्यातील आणि परिसरातील नागरिकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या प्रसंगी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथील डॉ. एन पी शिंगणे, डॉ. मुर्लीधर उमाटे, जिवती चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंबे, तसेच भारी, पाटण, शेनगाव, जिवती येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, गणपत झाडे, भीमराव मडावी, सुग्रीव गोतावडे, अभिजीत धोटे, नंदाताई मुसने, अश्फाक शेख, सिताराम मडावी, माधव डोईफोडे, अजगर शेख, बंडू राठोड, दत्ता गायकवाड, तिरुपती पोले, दत्ता तोगरे, बालाजी गोटमवाड, ताज्जुदिंन शेख, नारायण वाघमारे, उत्तम ढगळे, मारोती मोरे, बाळु पतंगे, दत्ता गिरी, सुनील शेळके, विष्णू रेड्डी, सुरेश कोडापे, जब्बारभाई शेख सत्तरशहा कोटनाके, दिवाकर वेट्टी, आशिष डासाने यासह अनेकांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *