अमेया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगारांना मिळवून दिली भरघोस पगार वाढ व इतर भत्ते ♦️माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उरण तालुका संघटक बी एन डाकी यांच्या यशस्वी मध्यस्थी बद्दल कामगारांच्या तर्फे जाहीर सत्कार

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे )

उरण दि २१ नोव्हेंबर
उरण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा कार्यसम्राट माजी आमदार व शिवतेज कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहरशेठ भोईर व उरण तालुका संघटक व प्रमुख सल्लागार बी एन डाकी यांच्या नेतृत्वाखाली तसेच सततचा पाठपुरावा योग्य मध्यस्थी व मार्गदर्शनामुळे अमेया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, खोपटे मधील पर्लफेल्ट सर्वेयर मधील सर्वे कामगारांना भरघोस पगारवर व विविध भत्ते मिळवून दिले आहेत यामध्ये अमेया कंपनीच्या सर्वेयरच्या ९ वर्षाच्या इतीहासात प्रथमच ७००० रु ची भरघोस पगार वाढ, प्रथमच पहील्या वर्षी ८०% , दुसऱ्या वर्षी १० % व तिसऱ्या वर्षी १०% पगारवाढ तसेच प्रथमच लीव ईन कॅश, आोटी डब्बल, इन्शुरन्स डेथ पॅालिसी व इतर सुविधा शिवतेज कामगार संघटनेच्या माध्यमातून मिळवून दिल्या, याबद्दल अध्यक्ष माजी आमदार मनोहरशेठ भोईर व प्रमुख सल्लागार बी एन डाकी यांचा सर्व कामगारांच्या तर्फे जाहीर सत्कार सोमवार दिनाकं २० नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आला, यावेळी उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे हेही उपस्थित होते.

या वेतन करारासाठी पर्लफेल्ट सर्वेयर कंपनीच्या वतीने श्री अशरफ,श्री प्रभाकर, शरद मढवी, विशाल पाटील शरद पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तर शिवतेज कामगार संघटनेच्या वतीने सरचिटणीस मयूर सावंत, कार्याध्यक्ष रविंद्र पाटील,अध्यक्ष सतिश म्हात्रे, उपाध्यक्ष प्रतिक म्हात्रे,सल्लागार मिथुन भगत, छगन ठाकुर, मंगेश डाकी, रोहीत भगत, अक्षय ठाकुर, राकेश म्हात्रे, कुलदीप भगत,महेंद्र म्हात्रे यांनी सहभाग घेतला

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *