दिवाली निमित्य सफाई कामगाराना मिठाई वाटप !! ⭕नगर सेवक डोहे यांचा उपक्रम

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

गडचांदुर – शहरातील रोज पहाटेपासून अल्पशा वेतनात शहराची स्वच्छता करणारे समस्त नगरपरिषदचे महिला, पुरुष सफाई कर्मचाऱ्याना नगरसेवक अरविंद डोहे यानी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा दिवाळीची भेट म्हणून मिठाईचे वाटप केले. सदरचा उपक्रम
अखंडपणे सुरु ठेवत या सर्व “कोरोना योद्धा” सफाई कामगार याना एका अर्थी प्रोसांहन आहे. सदर उपक्रम हा एक आदर्श सामाजिक उपक्रम असल्याची कौतुकास्पद भावना व्यक्त होताना दिसत होती.या प्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष सतीश उपलेंचीवार, नगरसेवक अरविंद डोहे,अरविंद कोरे,गोपाल मालपानी, सुधाकर बोरिकर,अरुण विधाते,अजीम बेग,इमरान पाशा,परशुराम मुसले,प्रवीण देवालकर, भोई समाज तालुका अध्यक्ष धर्मा वागमारे,शहर अध्यक्ष विलास केवट आदिंची प्रमुख्याने उपस्थित होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *