लायन्स क्लब सावर्डे तर्फे भारतीय समाज सेवा केंद्र संस्थेस पोषक आहार आणि सायकल भेट

 

लोकदर्शन सावर्डे(प्रतिनिधी-👉गुरुनाथ तिरपणकर)-

लायन्स क्लब सावर्डे तर्फे ला.विनय कदम यांच्या वाढदिवसानिमित्त’श्री केदारनाथ एंटरप्रायझेस’यांच्या सौजन्याने भारतीय समाज सेवा केंद्र,चिपळूण येथे 0ते६वर्ष वयोगटातील अनाथ मुलांच्या संस्थेस पोषक आहार आणि ४सायकल भेट म्हणून देण्यात आल्या.या कार्यक्रमाप्रसंगी दत्तक घेतलेल्या बालकांच्या पालकांचे मनोगत आणि दत्तक पालक योजनेबद्दल त्यांचा अनुभव ऐकण्याची संधी मिळाली.संस्थेच्या वतीने ला.विनय कदम यांचे वाढदिवसानिमित्त औक्षण करण्यात आले.ब्रँच डायरेक्ट श्री.राजकुमार सासपडे सरांनी संस्थेची माहिती दिली आणि लायन्स क्लब सावर्डेचे आभार व्यक्त केले.सदर उपक्रमास अध्यक्ष ला.डाॅ.निलेश पाटील,खजिनदार ला.अरविंद भंडारी,ला.सिताराम कदम,ला.अशोक बिजितकर, MJFला.गिरीश कोकाटे,ला.डाॅ.अरुण पाटील आणि ला.डाॅ.समीद चिकटे यांची उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here