भाजपा कोरपना तालुका महिला आघाडीच्या वतीने कोरपना येथील अंगणवाडी क्रमांक 6 मध्ये मेरी माटी मेरा देश तसेच स्वच्छता अभियानाचे आयोजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

भाजपा महिला आघाडीच्या वतीने कोरपना शहर येथील अंगणवाडी क्रमांक 6 मध्ये मेरी माटी मेरा देश तसेच स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक कु अल्काताई आत्राम प्रदेश महासचिव तथा माजी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष प्रमुख पाहुणे सौ विजया लक्ष्मी ताई डोहे जिल्हा महिला महासचिव,श्रीमती जयाताई धारणकर भाजपा नेत्या,सौ इंदिरा ताई कोल्हे जिल्हा सचिव,श्रीमती शोभाताई आगलावे भाजपा नेत्या,श्रीमती गिताताई डोहे नगरसेवका,सौ सविताताई तुमराम नगरसेवका,श्रीमती गुजाताई डोंगे अंगणवाडी सेविका,सौ बिडवाईक ताई अंगणवाडी सेविका,सौ मुके ताई ,सौ मडावी ताई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन कु अल्काताई आत्राम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण केले व इतर मान्यवरांनी पुजन केले सेवा पखवडा सप्ताह निमित्त अंगणवाडी क्रमांक 6 येथे झाडु मारुन साफसफाई करून मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व प्रत्येक महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या आपल्या वतीने मटक्यात माती टाकून सहकार्य केले कु अल्काताई आत्राम प्रदेश महासचिव यांनी मानले मनोगत व्यक्त करताना सेवा पखवडा सप्ताह हा कार्यक्रम प्रधानमंत्री मा श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून देशात साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर,गावातील महिलांनी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व आभार मानले तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अंगणवाडी सेविका मदतनीस,आशा वर्कर यांनी विविध समस्या मांडल्या त्या समस्या मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार पालक मंत्री यांच्या माध्यमातून सोडवु अशा भावना व्यक्त केल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर यांनी आमचा सत्कार केला,मान सन्मान केला व स्वागत केले व कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच घर चलो अभियान या प्रसंगी घेण्यात आला व कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन श्रीमती गुजाताई डोंगे अंगणवाडी सेविका यांनी केले तर आभार सौ बिडवाईक ताई अंगणवाडी सेविका यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *