जिल्हा परिषद शाळेची श्वेता उमरे महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप क   परीक्षा उत्तीर्ण,  सर्वत्र कौतुक!   

लोकदर्शन गडचांदुर, 👉अशोककुमार भगत )

कोरपना तालुक्यातील पालगाव

येथील श्वेता  बाबाभीम उमरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप क 2022  मुख्य परीक्षा देऊन घवघवीत यश संपादन करून परीक्षा उत्तीर्ण झाली. विशेष म्हणजे ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालगाव ची विद्यार्थिनी आहॆ.                                   पालगाव येथील श्वेता ही निवृत्त शिक्षक बाबाभीम उमरे हल्ली मुक्काम गडचांदूर यांची मुलगी आहे.  श्वेता ही जिल्हा परिषद प्राथमिक शालेत एक ते चार वर्गा पर्यंत शिक्षण घेऊन पुढे जवाहरलाल नेहरू विद्यालय आवारपूर येथून पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे बारावीचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथून घेतले. तर इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून पोटे अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथून पास झाली.

विशेष म्हणजे वर्ग एक ते अभियांत्रिकी परीक्षा अव्वल गुणांनी पास होऊन तालुक्यातून प्रथम ठरली.महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप क ची 2022 ची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाली. श्वेता ने ओपन मधून 24 वा तर अनुसूचित जातीतुन दुसऱ्या क्रमांकानी उत्तीर्ण झाली. श्वेता परीक्षा पास झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहॆ. आपल्या यशाबद्दल आई वडील, शिक्षक वृंद, मित्र परिवार, व परिवाराचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here