सायनच्या गुरु नानक महाविद्यलयात QR कोड लॉकेटचे अनावरण

 

लोलदर्शन सायन 👉शुभम पेडामकर

समाज हितासाठी सायन येथील गुरु नानक महाविद्यालय हे नेहमी तत्पर असते. आज दिनांक 12 सप्टेंबर, 2023 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात सामाजिक भान जपणारा कार्यक्रम पार पडला. आय. टी चे शिक्षण घेतलेल्या अक्षय रिडलान या माजी विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी केला आहे. मानसिक, शारीरिक दृष्ट्या दुर्बल आणि वृद्ध वर्ग आपली ओळख बऱ्याच वेळा नीट सांगू शकत नाही. त्यांची ओळख नीट कळावी यासाठी अक्षयने एक QR कोड लॉकेट तयार केले असून ते लॉकेट स्कॅन केल्यानंतर समोरील व्यक्तीची तपशीलवार माहिती मिळू शकते. त्यामुळे याचा फायदा खऱ्या अर्थानं मानसिक, शारीरिक दृष्ट्या दुर्बल आणि वृद्ध वर्गाला होणार आहे.

या लॉकेटचे अनावर मा. पद्मश्री डॉ.स्वाती पिरामल (वाईस चेअर पर्सन, पिरामल ग्रुप ) यांच्या हस्ते केले गेले असून महाविद्यलयाच्या प्राचार्या. डॉ. पुष्पिदंर भाटिया यांनी अक्षयच्या कामाचे कौतुक करत असताना त्या म्हणाल्या, ” समाजासाठी काम करणारी काही मोजकीच मंडळी असतात त्यात आमचा माजी विद्यार्थी अक्षय सुद्धा आहे याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे, यापुढेही अक्षयला महाविद्यालयाकडून अपेक्षित असणार सहकार्य केले जाईल. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.”

शुभम पेडामकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here