डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी केलेल्या वक्तव्याचा गोसावी समाजाकडून जाहीर निषेध😡😡

लोकदर्शन 👉 राहुल खरात

नागपुर:- डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी एका सभेत गोसावी समाज संत महंत यांना अनपढ तसेच जातीवाचक अपशब्द वापरून अवमानित केलेले आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीं नवीन संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी धर्मगुरू, संत, महंत यांना आमंत्रित केले होते. त्यावर विश्वंभर चौधरी यांनी गोसावड्यांना माननीय मोदींनी जवळ केले जे कधी शाळेत गेले नाहीत अशा निर्बुद्ध लोकांच्या हाती देशाचा कारभार दिलेला जनतेला चालेल का? असे अनुदगार काढले.
याबाबत हिंदू धर्मगुरू दसनाम गोसावी समाज यांनी तातडीची सभा घेऊन श्री विश्वंभर चौधरी यांचा जाहीर निषेध केला. तसेच शासन दरबारी निवेदन देण्याचे ठरले आहे. संपूर्ण देशातून या कृतीचा निषेध व्यक्त होत आहे. याप्रसंगी समाजाने एकत्रित येऊन लढा देण्याचे आवाहन अखाड़ा चे अध्यक्ष श्री गणेशजी पुरी तसेच, योगेशजी बन साहेब, दिलीपजी भारती, जगदीशजी
गिरी, यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे

गणेशजी पुरी
हिन्दू धर्मगुरु दसनाम गोसावी आखाडा, (नागपुर जिलाध्यक्ष)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here