Home
Home Breaking News बादल बालाजी गोटमुखले राष्ट्रस्तरीय पोस्टर स्पर्धेत प्रथम पुरस्काराने सम्मानित

बादल बालाजी गोटमुखले राष्ट्रस्तरीय पोस्टर स्पर्धेत प्रथम पुरस्काराने सम्मानित

 

लोकदर्शन 👉 प्रा. गजनान राऊत

गडचांदूर: महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथील बी. एस. सी. तृतीय वर्षाचा विद्यार्थी बादल बालाजी गोटमुखले याला चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, गोंडपिपरी येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित पोस्टर स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाविद्यालया द्वारे आयोजित बक्षिस वितरण कार्यक्रमात त्याला डॉ गिरिया, प्राचार्य, चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, गोंडपिपरी यांच्या हस्ते प्रथम पुरस्कार प्रशस्तीपत्र व बक्षीस स्वरूपात रोख रक्कम ३००० रुपये प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेत देशभरातून १२५ विद्यार्थ्यांने सहभाग नोंदविला होता. त्यातून महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स ,गडचांदूर तालुका कोरपना येथील विध्यार्थी श्री बादल गोटमुखले याची निवड प्रथम पुरस्कारासाठी झाली आहे हे विशेष. “सेव्ह अर्थ – गो सस्टेनेबल” हा या स्पर्धेचा विषय असून या विषयावर बादलने अत्यंत सुंदर व मार्मिक पोस्टर सादर केल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. बादल गोटमुखले याने आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शैलेंद्र देव व जैवतंत्रज्ञान विषयाचे विभागप्रमुख डॉ उत्कर्ष मून यांना दिले आहे. बादलच्या यशामुळे महाविद्यालयाच्या इतर विध्यार्थ्यांना अशा स्पर्धेत भाग घ्यायला प्रोत्साहन मिळेल असे मत डॉ देव यांनी व्यक्त केले आहे. कॉलेज चे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचे भरभरून अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here