



लोकदर्शन सांगली 👉 राहुल खरात
दि.२५ मार्च २०२३
वरील विषयास अनुसरून ग्रामीण भागातील प्रत्येक गावच्या विकासाचा कणा समजला जाणारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी महत्त्वाचे घटक आहेत या घटकाला कार्यक्षम व कार्यान्वित करण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी उपयोगी पडेल. ग्राम विकास अधिकारी , आरोग्य अधिकारी , तलाठी असतील यांना लागू होणारी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली हे गावच्या विकासासाठी व लोकांच्या गैरसोयीसाठी उपयोगी ठरणारी आहे.त्यामुळे गावातील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन राहील.त्यामुळे गावातील नागरिकांचे प्रश्न सुटतील.
ग्रामसेवक ,तलाठी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक ,पशुधन दवाखान्यातील कर्मचारी यांना बायोमेट्रिक केल्यामुळे वेळेवर उपस्थित दर्शवतील व गावातील लोकांची हेडसाळ होणार नाही. त्यामुळे लोकांचे कामे वेळेत होतील.
गावातील लोक शेती पशुपालन यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांना रोज हेलपाटे मारने शक्य नाही .
काही अधिकारी कार्यालयामध्ये आठवड्यातील पाच ते सात दिवसानंतर काही वेळापुरते उपस्थिती दर्शवतात अशी चर्चा आहे त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक झाली पाहिजे तसेच सरकारी कार्यालयांमध्ये सरकारी कामामध्ये अडथळा अशी नियमावली ची फलक लावली आहे. त्याची भीती सामान्य माणसांना दाखवली जाते.त्यामुळे सामान्य माणसाच्या अधिकाराची फलक लावण्यात यावे.या सर्व प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावे त्यामुळे कार्यालयामध्ये पारदर्शकता राहील व कोणत्याही प्रकारचे तक्रारी राहणार नाहीत. यावरती योग्य ती कारवाई होऊन अमलबजावणी व्हावी ही विनंती.याच्यावरती योग्य ती कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी मिरज तालुकाध्यक्ष विशाल धेंडे, महासचिव सागर आठवले, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संघटक शंकर सुतार, उपाध्यक्ष प्रदीप कोलप आदी सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.