चित्रकला स्पर्धा व परीक्षेवर चर्चा 2023*

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

देशाचे पंतप्रधान मा. श्री . नरेंद्र मोदीजी सन 2018 पासून परीक्षेपूर्वी परीक्षेवर चर्चा कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यावरील परीक्षेचा ताण दूर करण्यासाठी आपले अनुभव व तणाव दूर करण्याचे मार्ग सांगून विद्यार्थ्याना प्रोत्साहित करीत आहेत. या अनुशंगाने चंद्रपूर जिल्यातील गडचांदूर शहर क्षेत्रातील चित्रकला स्पर्धा दिनांक 24/01/2023 ला विविध शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेत एकूण 10 विषय असून आपल्या क्षेत्रातील शाळेतील शिक्षकवृद यांनी योग्य असे सहकार्य केले.

*सहभागी शाळेची नावे*

▪️मानिकगड इंग्लीश स्कुल गडचांदूर
▪️सावित्रीबाईं फुले कन्या विद्यालय गडचांदूर
▪️लाल बाहादुर शास्त्री शाळा गडचांदूर
▪️स्व.भाऊराव पाटील आश्रम शाळा गडचांदूर
▪️महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर
▪️ अंबुजा विद्या निकेतन उपरवाही
▪️ प्रभू रामचंद्र हायस्कुल नांदा
▪️शिवाजी हायस्कुल तथा कॉलेज नांदा फाटा
▪️ जिल्हा परिषद शाळा बाखर्डी

या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सुंदर असे चित्र रंगवली व मोठया उत्साहाने सहभाग घेतला. या प्रा कार्यक्रमाचे संयोजक म्हणून भारतीय जनता युवा मोर्च्या तर्फे प्रतीक सदनपवार, रोहन काकडे, महेश घरोटे , इम्रान पाशाशेख, सुयोग कोंगरे, विक्की मेळावार, अभिजित शेंडे, पंकज इटनकर, रवी बंडीवार , आकाश बोडगीलवार, ऍड दीपांजली मंथनवार सौ. सपनाताई सेलोकर, यांच्या सहकार्यास कार्यक्रम पार पडला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *