*आदर्श हिंदी प्राथमिक विद्यामंदिर येथे बाल आनंद मेळावा संपन्न*

 

लोकदर्शन 👉प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर- शहरातील आदर्श प्राथमिक हिंदी विद्यामंदिर येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन विद्यार्थी मंत्री मंडळाने केले. या मेळाव्याचे उद्धाटन शिक्षण विस्तार अधिकारी सचिनकुमार मालवी यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका डॉ. मंजुषा मत्ते व शाळेतील शिक्षक, पालक उपस्थित होते. मेळाव्यात एकूण ३४ स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते. पालकासह विद्यार्थी व शिक्षकांनी बाल आनंद मेळाव्याचा मनसोक्त आनंद घेतला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सचिनकुमार मालवी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अनंत काळे यांनी तर आभार प्रदर्शन राकेश गोरे यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *