पारस काव्य,कला,जनजागृती संस्थेकडून राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २७.डिसेंबर पारस काव्य,कला,जनजागृती संस्थेकडून राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन सानपाडा, नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. प्रतिवर्षी संस्थेमार्फत नव्या विषयासह काव्यस्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा आयोजित करण्यात येते.तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. यंदा संस्थेचे १२ वे वर्ष असून उरण विभागातून आदर्श शिक्षक पुरस्कार समीर म्हात्रे तर शिक्षकरत्न पुरस्कार राकेश पाटील तसेच समाजभूषण पुरस्कार नंदकुमार तांडेल हे २०२२ वर्षाचे मानकरी ठरले. सर्वांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची संस्थेकडून दखल घेऊन सदर पुरस्कार सोहोळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मंगेश चांदिवडे तसेच संस्थेचे कार्यकारिणी मंडळ यांनी खूप मेहनत घेऊन सदर पुरस्कार सोहळा यशस्वीपणे पार पाडला. सदर पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातून आलेल्या विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. सदर सोहळ्यास संस्थेच्या आयोजक तसेच खजिनदार शोभा चांदिवडे, प्रमुख पाहुणे पुंडलिक म्हात्रे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मंहत संजय बर्वे, सारडे विकास मंच अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे हे उपस्थित होते. या सोहोळ्याचे सुंदर सूत्रसंचालन निवेदक मनीषा कडव तसेच प्राध्यापक शंकर गोपाळे यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *