डॉ. भूषण मोरे यांना ‘आरोग्य भूषण पुरस्कार’

By : Shankar Tadas
गडचांदूर :
अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आणि इतर सामाजिक उपक्रमातून आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. भूषण मोरे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य द्वारा यावर्षीचा राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार 2022 हा आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल 25 डिसेंबर 2022 रोजी अहमदनगर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिर्डीचे खासदार भाउसाहेब वाकचौरे, बाबासाहेब पावसे पाटिल, डॉ सुधिरजी ताम्बे, अभिनेता भट यांच्या हस्ते डॉ. मोरे यांना सन्मानित करण्यात आले.
राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे हे माझ्यासाठी विशेष आहे याचा खूप आनंद होतोय. आज बाबांना मिस केलं, हा पुरस्कार त्यांना समर्पित. सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली. जबाबदारी आणखी वाढली. आतापर्यंतच्या प्रवासात बाबा, आई , नंदिनी, बहिणी आणि मार्गदर्शक शुभचिंतक आरोग्यदूत आरोग्य सखी या सर्वांचे सहकार्य लाभले, अशी भावना डॉ. भूषण मोरे यांनी व्यक्त केली आहे.

****

संपादक : लोकदर्शन : Shankar Tadas : 9850232854

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here