आटपाडी तालुका पत्रकार संघ,अध्यक्ष, मुजु तांबोळी, उपाध्यक्ष सदाशिव पुकळे यांची निवड ! चार पैशा साठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना, यांना वेठीस धरणाऱ्या तथा कथित पत्रकारां विरुद्ध आवाज उठवण्याचा निर्धार ! किशोर पुजारी

 

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात
आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै . तरुण भारतचे दिघंचीचे प्रतिनिधी मुजू तांबोळी यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी लक्ष्मण सरगर यांची तर उपाध्यक्ष म्हणून श्री.सदाशिव पुकळे यांना निवडण्यात आले .
पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष किशोर पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांच्या सन्माननीय उपस्थितीत या निवडी पार पडल्या .
उपस्थित सर्वच पत्रकारांनी दै तरुण भारत चे आटपाडी तालुका प्रतिनिधी सुरज मुल्ला यांनी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पद स्विकारावे म्हणून जोरदार आग्रह धरला . तथापि त्यांच्या नम्र नकारानंतर त्यांच्या पुढाकाराने आणि लक्ष्मण सरगर सदाशिव पुकळे यांच्या समर्थनाने मुजू तांबोळी यांना या वर्षासाठी आणि लक्ष्मण सरगर यांना पुढच्या वर्षी अध्यक्ष करण्याचे घोषीत करण्यात आले .
६ जानेवारी च्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक वक्ते म्हणून राज्यातील अग्रगण्य संपादक पत्रकार संजय आवटी यांना आणण्यावर एकमत करण्यात आले .
पत्रकार भवन साठी योग्य जागा आणि पुरेसा निधी उपलब्ध होण्यासाठी माझ्या प्रयत्नांना सर्व पत्रकारांनी साथ द्यावी . एका वर्षातच हा प्रश्न पुर्णांशाने निकाली काढत पत्रकार भवन साकारल्याचे आपण दाखवून देवू अशा भावना ज्येष्ट पत्रकार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी यावेळी व्यक्त केल्या .
यावेळी संघटनेच्या सचिव पदी सुरेश मोकाशी, खजिनदार पदी बिपीन देशपांडे, सदस्य म्हणून सचिन कारंडे यांची निवड करण्यात आली. निवडी प्रसंगी सतीश भिंगे, प्रशांत भंडारे, नागेश गायकवाड, सुरज मुल्ला, कांतीलाल कारळे, दिपक प्रक्षाळे, गणेश जाधव, सुरेश मोकाशी, अशोक पवार, विक्रम भिसे, शिवानंद क्षीरसागर, अमोल काटे, सचिन कारंडे उपस्थित होते .
चार पैशासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या तथाकथीत भामट्या पत्रकारांविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि तालुक्यातील सर्व क्रियाशील सच्च्या पत्रकारांना या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा मनोदय किशोर पुजारी यांनी व्यक्त करून आभार मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here