इन्फंट कॉन्व्हेंट येथे गणित दिवस उत्साहात संपन्न.


लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा (– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामाणुजम यांची जयंती व गणित दिवसाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गणित विषयावर आधारित गीत, संगीत, नृत्य वेशभूषा, भुमिका अभिनय, प्रतिकृतींचे प्रदर्शन, प्रश्नमंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रम सादर केले.
या प्रसंगी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जोया चाऊस, अनुराज पांडे या विद्यार्थ्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here