महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ पदाधिका-यांचा कोकण जनसंपर्क अभियान दौरा संपन्न

लोकदर्शन इचलकरंजी👉(गुरुनाथ तिरपणकर)-”
धागा धागा अखंड विणूया कोष्टी समाज एक करुया”या संकल्पनेतून सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्यव्यापी दौ-याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रकाशराव सातपुते,महासचिव श्री.रामचंद्र निमणकर,सदस्य श्री.दिलीप भंडारे,श्री.शुभंम रोकडे इत्यादी पदाधिका-यांनी नुकताच तीन दिवसांचा कोकण जनसंपर्क अभियान दौरा पुर्ण केला.या दौ-याची सुरुवात कणकवली जि.सिंधुदुर्ग येथून करण्यात आली.कसाल(कुडाळ),खारेपाटण,आबलोली येथे माजी अध्यक्ष उद्योगपती श्री.चंद्रकांत बाईत यांची भेट घेऊन खेड(जि.रत्नागिरी),कोष्टीवाडी,पेढे,सावर्डे इत्यादी ठिकाणच्या मंदिरांना भेटी देऊन कोष्टी समाज बांधवांशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी समजावून घेवून त्यांना मार्गदर्शन केले.तसेच ज्या-त्या भागातील कोष्टी समाज बांधवांनी हाती घेतलेल्या विधायक कामाचे कौतुक करण्यात आले.प्रत्येक ठिकाणी समाज बांधवांनी सुरु केलेल्या संपर्क दौ-याचे कौतुक करून समाज एकसंघ करण्याच्या तसेच विकासाच्या सर्व कामात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या दौ-यात कणकवली येथील अध्यक्ष विजय कांबळे व सचिव अनंत हजारे,सुधीर धुमाळे,दयानंद उबाळे,प्रकाश मुसळे,गणेश हर्णे(उपनगराध्यक्ष),खारेपाटण येथील प्रविण लोकरे कसाल येथील शैलेश मुसळे,खेड येथील अध्यक्ष प्रविण दिवटे,खजिनदार सिध्देश खामकर,सुनिल टकले,विशाल दिवटे,सौ.भावीशा रेपाळ,अजित रेडेकर,साक्षी सुदेश खामकर,वृषाली वैभव खामकर,कोष्टीवाडी पेढे येथील अध्यक्ष मुकुंद वारे,प्रविण पाकले,सावर्डे येथील रत्नागिरी जिल्हा कोष्टी समाज मंडळाच्या मिटींगमध्ये भेट दिली.तेथील अध्यक्ष गजानन लोकरे,उपाध्यक्ष कृष्णा उकार्डे,सचिव अरविंद भंडारी,खजिनदार संतोष गुरसाळे,सौ.गितांजली लोकरे,सौ.प्रज्ञा पाणिंद्रे इत्यादींचे भरीव सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here