*श्री गाडगे महाराज आश्रम शाळा भिवाळी येथे गाडगे बाबा पुण्यतिथी सोहळा संपन्न*.

लोकदर्शन भिवंडी👉 गुरुनाथ तिरपणकर

मंगळवार दिनांक २०/१२/२०२२ रोजी भिवंडी तालुक्यातील भिवाळी गावातील श्री गाडगे महाराज प्राथमिक/माध्यमिक आश्रम शाळेत संत गाडगे बाबा महाराज यांना मानवंदना देऊन मुलींच्या नूतनीकरण केलेल्या वसतिगृहाचे उद्धघाटन व मुला-मुलींच्या च्या कला गुणांना वाव देण्यासाठी शाळेला भेट मिळालेल्या दूरचित्रवाणी संच चे उद्धघाटन करत सुंदर नियोजनात ६६ वी पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघचे अध्यक्ष व लोअर परेल वरळी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मा. प्रकाश पाटकर, अशोका फाऊंडेशन चे अध्यक्ष मा.हरीश पगारे,शाळेचे संचालक मा.अनिल आवटे,सामुदायिक विवाह सोहळा राबवणारे मा. पुरुषोत्तम पाटील, शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान चे संस्थापक मा. सुनील शिर्के (वकील) श्री. आण्णासाहेब आहेर (पत्रकार- समाजसेवक), बांधकाम व्यावसायिक मा. रवी पाटील, आयकॉन फाऊंडेशनच्या उपआध्यक्ष छाया गचके ह्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मा. हरीश पगारे यांनी स्वीकारले व मुलींनी लेझिम नृत्य डान्स करत कार्यक्रम मनोरंजक केले. श्रीमान धरमपालजी पोद्दार मुंबई ट्रस्ट यांनी भेट दिलेल्या दूर चित्रवाणी संच चे उद्घघाटन मा.प्रकाश पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले व मुलींच्या नूतनीकरण केलेल्या वसतिगृहाचे उद्घघाटन मा. पगारे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन करत मा. आहेर यांनी मुलांनी श्री गाडगे बाबांच्या शिकवणीतून शिक्षण घेत भविष्यात घरची परिस्थिती संभाळून निस्वार्थी सत्कर्मी कार्य हे गाडगे बाबांच्या च्या प्रमाणे करण्याचे मुलांना सूचित करत शुभेच्छा देत मुलांचे छान शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचे व मुलांचे छान आरोग्य जपणाऱ्या कर्मचारी वर्गाचे कौतुक केले तर शिक्षक मा. श्री.इंगळे सर व श्री शिंबरे सर यांनी गाडगे बाबांचे कार्य सविस्तर वर्णन केले व प्रास्ताविक मा.आवटे सर यांनी केले, सूत्र संचालन मा.श्री थोरात सर यांनी केले, बाबांच्या कार्यक्रमाच्या शेवटी गाडगेबाबा रचीत पसायदान बोलून मा. चौधरी सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *