समुद्र मंथन 2.0 मोहिमेच्या माध्यमातून पिरवाड समुद्रकिनारी स्वच्छता अभियान. उरण पिरवाड समुद्रकिनारा झाला स्वच्छ

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे )

उरण दि 11 डिसेंबर 2022 नागरीकांमध्ये स्वच्छते विषयी जनजागृती व्हावी, नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे तसेच समुद्रकिनारी पर्यटन वाढीस लागून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेने तर्फे 11 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्राला लाभलेल्या 6 जिल्हयातील सुमारे 720 कि.मी लांबीच्या समुद्र किनार पट्टीवरील 40 पेक्षा अधिक समुद्र किना-यांवर समुद्र मंथन 2.0 मोहिमे अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

समुद्र मंथन 2.0 या मोहिमे अंतर्गत रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. उरण तालुक्यात पिरवाडी समुद्रकिनारी दि 11/12/2022 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत मनसे पर्यावरण सेनेच्या माध्यमातू यूईस इंग्लिश मिडीयम कॉलेज उरण (एनएसएस युनिट ) व पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडीयम स्कूल वेश्वी (उरण) यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर,पनवेल महानगर शहर अध्यक्ष योगेश चिले,पर्यावरण सेनेचे रायगड, ठाणे जिल्ह्याचे सचिव स्नेहल राजमाने,शहर उपाध्यक्ष पनवेल संजय मुरकुटे, वाहतूक सेना विधानसभा चिटणीस सतीश पाटील, मनसे उप शहर अध्यक्ष हितेश साळुंके, महिला शहर अध्यक्ष सुप्रिया सरफरे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष प्रतीक अमृते, द्रोणागिरी शहराध्यक्ष रितेश पाटील, बोकडविरा शाखाध्यक्ष -आवेश ठाकूर, द्रोणागिरी शहर उपाध्यक्ष समीर म्हात्रे, शाखाध्यक्ष गणेश गायकर, श्रेया ठाकूर, उमेश वैवडे, दिपक प्रसादे, राजेश सरफरे, सागर पाटील आदी मनसेचे पदाधिकारी, यूईएस कॉलेजचे शिक्षक हेमांगी म्हात्रे, कु.किमया ठाकूर, कु. निकिता म्हात्रे व एनएसएस युनिटचे विद्यार्थी, पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडीयम स्कुल वेश्वी उरण या शाळेचे मुख्याध्यापक प्रितम टकले व शिक्षक कर्मचारी वर्ग, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत पिरवाडी समुद्रकिनारी असलेले प्लास्टीकच्या पिशव्या, कचरा, दारूचे बाटल्या , मानवी कचराचे साफसफाई करण्यात आले. साफसफाई केल्याने पिरवाडी समुद्रकिनारा आता स्वच्छ व सुंदर दिसू लागला आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *