विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आंदोलन.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 11 डिसेंबर 2022सी डब्लू सी लॉजिस्टिक पार्क भेंडखळ, तालुका उरण, जिल्हा रायगड येथील टीम ग्लोबल /पोलारीस लॉजिस्टिक पार्क कंपनीला मिळालेल्या कामामध्ये भेंडखळ गावातील सुमारे 325 प्रकल्पग्रस्त कामगारांना प्राधान्याने नोकरी देण्यात यावी. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यां पूर्ण व्हाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवार दि 9/12/2022 रोजी हिंद टर्मिनल कंपनी गेट समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष मनोज भगत,एम बी पाटील, नरेश म्हात्रे, भूषण ठाकूर, रमेश ठाकूर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते, कामगार वर्ग, भेंडखळ गावातील ग्रामस्थ, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

उरण तालुक्यातील भेंडखळ गावाजवळील सी डब्लू. सी. मधील 75 एकर चे सर्वात मोठे CFS आहे सदर CFS च्या उद्घाटन सन 2006 साली केंद्रिय कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते झाले होते.त्यानंतर 2006 पासून ते आतापर्यंत सदर 75 एकर चे CFS हिंद टर्मिनल प्रा.लि. ने वार्षिक भाडे तत्वावर घेतली होती. सन 2006 पासून दरवर्षी भाडेवाढ होत गेली. शेवटच्या टप्यात हिंद टर्मिनल प्रा. लि. हे सुमारे 63 कोटी रुपये वार्षिक भाड़ा सी डब्लू सी ला भरत होती.शेवटच्या टप्यात भाडे करार मध्ये सामंज्यास न झाल्याने व भाडे कमी न केल्याने हिंद टर्मिनल प्रा.लि. सदर जागेवरचे काम सोडून दिले.आता मात्र हेच 75 एकर चे सर्वात मोठे CFS टीम ग्लोबल द्रोणगिरी नोड / पोलारिस लॉजिस्टिक्स पार्क या कंपनीला सुमारे 24 कोटी रुपये वार्षिक भाडा तत्वावर मिळालेले आहे.टीम ग्लोबल द्रोणगिरी नोड / पोलारिस लॉजिस्टिक्स पार्क ला हिंद टर्मिनल प्रा. लि. पेक्षा सुमारे 39 कोटी रुपये कमी वार्षिक भाडा असल्याने टीम ग्लोबल द्रोणगिरी नोड / पोलारिस लॉजिस्टिक्स पार्क ला 39 कोटी रुपये भाड्याच्या रूपात लाभ होत आहे तरी ही भेंडखळ गावातील सुमारे 325 प्रकल्पस्त पूर्वीच्या हिंद टर्मिनल चे कामगारांना पूर्वीच्या हिंद टर्मिनल कंपनी मध्ये असणारा पगारच देण्यात यावा अशी मागणी कामगारांची आहे.या विविध मागण्या पूर्ण व्हावेत यासाठी दिनांक 09/12/2022 रोजी उरण तालुक्यातील भेंडखळ गावाजवळील सी.डब्लू.सी. मधील 75 एकर चे सर्वात मोठे CFS गेटजवळ घेण्यात आलेल्या बैठकीला सुमारे 500 हून अधिक प्रकल्पग्रस्त कामगार हजर होते.सदर बैठकीचे आयोजन काँग्रेसचे यशवंत म्हात्रे(भेंडखळ )यांनी केले होते.

 

सी.डब्लू.सी. लॉजिस्टिक्स पार्क द्रोणागिरी नोड चे काम टीम ग्लोबल (पोलारिस लॉजिस्टिक्स पार्क)कंपनीला मिळाले आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तसेच कामगारांतर्फे खालील प्रमाणे मागण्या करण्यात आले आहेत.

1)भेंडखळ गावातील सुमारे 325 प्रकल्पग्रस्त पूर्वीच्या हिंद टर्मिनलचे कामगारांना (लेबर, सर्व्हेअर हाऊस कीपिंग, कलमार ऑपरेटर लेबर फोर्कलिफ्ट ऑपरेटर लेबर) यांना नोकरी देण्यात यावे.

2)पूर्वीच्या हिंद टर्मिनल कंपनी मध्ये असणारा पगारच देण्यात यावा.

3) सी. डब्लू. सी. डिस्ट्रीपार्क बंद करणार नाही, याची लेखी हमी टीम ग्लोबल / पोलारिस लॉजिस्टिक्स पार्क चे पार्टनर संतोष शेट्टी (कोनॅक्स प्रा.लि. सी. डब्लू. सी. डिस्ट्रीपार्क) यांनी द्यावी.

4) सर्व कॉट्रॅक्ट भेंडखळ गावातील प्रकल्पग्रस्ताना देण्यात यावेत.

कोट (चौकट ):- भेंडखळ गावातील कोणत्याही स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही. प्रकल्पग्रस्त कामगारांवर कोणी अन्याय केल्यास ते आम्ही खपवून घेणार नाही. जोपर्यंत स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आम्ही लोकशाही मार्गाने, कायदेशीर मार्गाने लढा लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजेत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन उभारू. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी कंपनी प्रशासन व महाराष्ट्र राज्य जबाबदार असेल.
– प्रशांत पाटील
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *