महात्मा गांधी विद्यालयात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर ,द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय ,गडचांदूर येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापीका तथा प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,पर्यवेक्षक एच बी मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे, प्रा प्रफुल्ल माहुरे उपस्थित होते .प्रारंभी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,प्रा चेतना कामडी यांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व संतांची महती पटवून दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रा राकेश ठवरे यांनी केले तर आभार प्रा.नितीन वाढई यांनी मानले . याप्रसंगी दिन विशेष समिती च्या प्रमुख प्रा नंदाताई भोयर,प्रा आरजू आगलावे,इतर शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here