सावित्रीबाई फुले विद्यालयात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर ,द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. डी. आर. काळे सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून कला विभाग प्रमुख प्रा. प्रशांत खैरे विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापिका ताकसांडे मॅडम, व्यवसाय विभाग प्रमुख प्रा विजय मुप्पिडवार उपस्थित होते .उपस्थितमान्यवरांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व सर्वांनी संतांची महती पटवून दिली. कार्यक्रमाचे संचालन तथा प्रास्ताविक प्रा.अनिल मेहरकुरे यांनी केले तर आभार प्रा.दिनकर झाडे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी ,प्राध्यापक ,प्राध्यापिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here