



लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 1 डिसेंबर 2022उरण तालुक्यातील 18 डिसेंबर 2022 रोजी 18 ग्रामपंचायत च्या निवडणूका संपन्न होणार असून या निवडणूकीचा निकाल 20 डिसेंबर 2022 रोजी लागणार आहे. त्या अनुषंगाने उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायत साठी शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाने यूती केली असून या यूतीच्या माध्यमातून पागोटे ग्रामपंचायतची निवडणूक लढविली जाणार आहे आज दि. 1 डिसेंबर 2022 रोजी पागोटे ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी शिवसेना व शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) युतीचे सरपंच पदाचे उमेदवार कुणाल अरुण पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना यावेळी रमेश पाटील , मनोहर पाटिल, अरुण पाटिल, अनिल पाटील, महेन्द्र पाटील, प्रकाश भोईर, सुमित पाटील, बालकृष्णा पाटिल, मोहन पाटिल, महेश पाटील, विश्वनाथ पाटिल आदी मान्यवरांसह पागोटे गावातील ग्रामस्थ,पदाधिकारी, कार्यकर्ते, कुणाल पाटील यांचे हितचिंतक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुणाल पाटील यांनी आपला सरपंच उमेदवारिचा फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी अनिल जगधनी यांच्याकडे सुपूर्द केला. कुणाल पाटील हे सरपंच पदाचे उमेदवार असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.