स्वतःच्या घरापासून शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटवणारा पहिला कृतिशील समाज सुधारक महात्मा फुले* *डॉ.अमोल पवार यांचे प्रतिपादन* *मारुती शिरतोडे यांचा सत्यशोधक शिक्षक प्रेरणा पुरस्काराने गौरव*

लोकदर्शन 👉 राहुल खरात

एकशे पंचाहत्तर वर्षापूर्वी आधुनिक महाराष्ट्राची प्रगती चिंतनारा व देशाला शैक्षणिक क्रांतीची दिशा देणारा पहिला कृतिशील समाज सुधारक महात्मा फुले हेच असून त्यांनी आपल्या शैक्षणिक क्रांतीची मशाल स्वतःच्या घरापासून सुरू करुन समाजातल्या गोरगरीब अस्पृश्य दलित कष्टकऱ्यांच्या घरापर्यंत नेली. म्हणूनच बहुजन समाजातील स्त्रिया, मुलं शिकू शकली असे प्रतिपादन महामार्ग संघर्ष समितीचे नेते,सामाजिक कार्यकर्ते डॉ.अमोल पवार यांनी आज पलूस येथे केले. जिल्हा परिषद शाळा नं.2 पलूस मधील प्रयोगशील समाज कार्यकर्ते असणारे शिक्षक कॉम्रेड मारुती शिरतोडे यांना सत्यशोधक शिक्षक प्रेरणा पुरस्कार प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी शिक्षण विभागाच्या पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख राम चव्हाण होते. सभा मंचावर ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव ,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव, अग्रणी सोशल फाउंडेशन प्रमुख अप्पासाहेब माने,सागर माने, विमुक्त भटक्या वंचित समूहाचे सचिव मुनीर सुलताने,बाबुराव जाधव,नंदकुमार निकम,सागर माने,निखील एडके,विशाल भिंगारदिवे,मुख्याध्यापिका उज्वला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मारुती शिरतोडे यांना अग्रणी सोशल फाउंडेशन व विमुक्त भटक्या वंचित समूह गटाच्या वतीने सत्यशोधक शिक्षक प्रेरणा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. फुले पगडी, उपरणे, महात्मा फुलेंचा समग्र ग्रंथ,महात्मा फुलेंची प्रतिमा व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी बोलताना डॉ. अमोल पवार यांनी समाजातील सर्व समस्यांचे मूळ शिक्षणात लपलेले असून फुलेनी शिक्षणाला प्राधान्य दिले आणि माणसाला वैचारिक वैचारिक दिशा दिली असे सांगितले तर ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांनी फुलेंच्या शैक्षणिक व सामाजिक क्रांतीवर अनेक उदाहरण दाखले देत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.म फुले यांची प्रतिकात्मक असणारी फुले पगडी व उपरणे ही आपली शैक्षणिक व सामाजिक जबाबदारी वाढली असं सांगणारी बाब असून उपेक्षित व वंचित समाजघटकांच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने काम करत राहणार असे काँ.मारुती शिरतोडे म्हणाले. पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख राम चव्हाण यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले तर शिक्षक बँकेचे संचालक नितीन चव्हाण यांनी आभार मानले. मानपत्राचे वाचन विशाल भिंगारदिवे यांनी केले तर सूत्रसंचालन बाळासाहेब खेडकर यांनी केले. या सत्कार सोहळ्यास जिल्हा परिषद शाळा नं.1 चे वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण, शाळा नं.2 च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका उज्वला पाटील, शाळा न.3 च्या वनिता कांबळे, तिन्ही शाळातील सर्व शिक्षक , सर्व विद्यार्थी, नंदकुमार निकम,आबासाहेब माने अग्रणी सोशल फाउंडेशन चे कार्यकर्ते पदाधिकारी, विमुक्त भटक्या वंचित समूह गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *