महात्मा गांधी महाविद्यालयात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची 91 वी जयंती दिनांक 15 ऑक्टोबर 2022 ला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. डॉ.अब्दुल कलाम हे एक वैज्ञानिक, संशोधक व प्राध्यापक सुद्धा होते, त्यामुळे त्यांनी विद्यार्थी व शिक्षक केंद्रबिंदू म्हणून साहित्याचे लेखन केले आहे तसेच आपल्या जीवनामध्ये एकूण 45 पुस्तके लिहिली त्यातली बरीचशी शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करणारी आहेत. डॉ. अब्दुल कलाम यांचे बालपण हे गरिबीत जरी गेलं असल तरी उत्तरोत्तर आयुष्य मात्र देशाच्या तळागाळातल्या व देशाच्या उत्थानासाठी लागलेले आपल्याला दिसते. त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या कर्तुत्वाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. या दिनाच्या औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जपावी व वाचनाची आवड वाढावी म्हणून कार्यक्रमाचे आयोजन केले होते, आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये प्रत्येकाचे लक्ष हे वाचनावरून उडत असून मोबाईलच्या अवतीभवती फिरत असल्याचे दिसते त्यामुळे वाचनाची सवय लोप पावताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.प्रभारी प्राचार्य श्री रामकृष्ण पटले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले तसेच या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ सुनिल बीडवाईक , (इंग्रजी विभाग प्रमुख, शरदचंद्र पवार महाविद्यालय गडचांदुर) हे होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालय माहिती केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनोहर बांद्रे, ग्रंथपाल महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स यांनी केले. प्रास्ताविकतेमध्ये मनोहर बांद्रे म्हणाले आपल्या जीवनामध्ये वाचनाचे अत्यंत महत्त्व आहे वाचनामुळे आपली भाषा सुधारते, ज्ञानामध्ये वृद्धी होते, शब्दसाठा वाढतो, मनशांती मिळते, वक्तृत्व व संभाषण कला विकसित होते तसेच व्यक्तिमत्त्वा च्या विविध पैलूंचा विकास होतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी रोज किमान एक तास तरी चांगल्या ग्रंथाचे वाचन करावे विद्यार्थ्यांना समोरील आयुष्यात साहित्य लेखन करायचे असल्यास, प्रोजेक्ट लिहायचे असल्यास माहितीची अत्यंत आवश्यकता असते आणि त्यासाठी वाचन व श्रवण हे दोनच विकल्प आपल्याकडे आहेत या कार्यक्रमासाठी प्राध्यापक रामकृष्ण पटले सरांनी भरीव मदत केली व डॉ. सुनील बीडवाईक यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवन प्रवास सविस्तरपणे मांडला त्यामध्ये त्यांनी वाचनाचे महत्त्व विशद करून सांगितले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर अजय कुमार शर्मा यांनी मानले या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील डॉ उत्कर्ष मून, प्रा. चेतन वैद्य, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *