महात्मा गांधी विद्यालयात श्रीमती इंदिरा गांधी व सरदार पटेल यांना अभिवादन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी तसेच लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती सोमवारी साजरी करण्यात आली
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे होत्या
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की होते,
सर्वप्रथम माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,
याप्रसंगी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला,
कार्यक्रमाचे संचालन प्रा नंदाताई भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोज तोडासे यांनी केले, याप्रसंगी दिनविशेष समितीचे पदाधिकारी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *