गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न


लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचांदूर ची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली.
सभेच्या अध्यक्ष स्थानी पतसंस्था चे अध्यक्ष संजय झाडे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,प्राचार्या स्मिताताई चिताडे,प्राचार्य साईनाथ मेश्राम, सेवानिवृत्त प्राचार्य शरद जोगी,सेवानिवृत्त पर्यवेक्षिका शोभा जिवतोडे, सेवानिवृत्त शिक्षक बी एस पत्तीवार,बंडुभाऊ धोटे, सुरेश मेश्राम, प्रभूदास वासाडे,पतसंस्था चे सचिव प्रा प्रफुल्ल माहुरे,उपाध्यक्ष पद्माकर खैरे,कोषाध्यक्ष विजय डाहूले, संचालक सुभाष खुजे,अनिल मडावी ,स्वाती केळकर, भारती घोंगे,होत्या.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सदस्यांचा पतसंस्था च्या वतीने सत्कार करण्यात आला.
पतसंस्था चे सचिव प्रफुल्ल माहुरे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. जमा खर्च ला मंजुरी देण्यात आली.
106 सदस्य संख्या असलेल्या पतसंस्थाला मागील वर्षी निव्वळ नफा 2 करोड 15 लक्ष 1 हजार560 रुपये झाला आहेत, असे सांगून नफ्यात दरवर्षी कशी वाढ होईल याबाबत संचालक मंडळ सदैव तत्पर राहील असे सांगितले. सत्कारमूर्ती नी आपल्या भाषणात पतसंस्था च्या कार्याचा गौरव केला,सभेला महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर, सोनूर्ली, नांदगाव, तसेच महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय गडचांदूर चे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते, सभेचे प्रास्ताविक अनिल मडावी यांनी केले, संचालन पद्माकर खैरे यांनी केले तर आभार प्रदर्शन व्यवस्थापक प्रमोद काळे यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *