



,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉(प्रा,अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अहिंसा चे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चा नारा देणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचे जीवन चारित्र्य विद्यार्थ्यांनी वाचून त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्या स्मिताताई चिताडे यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले.
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापिका तथा प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की,,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा,अशोक डोईफोडे होते,
सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,
याप्रसंगी महात्मा गांधी चे जीवन कार्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली, प्राथमिक गटात प्रथम क्रमांक फाल्गुनी काकडे ,द्वितीय उज्वलकुमार रॉय, तर तृतीय क्रमांक नंदिनी रॉय हिने पटकावला.
माध्यमिक गटात प्रथम क्रमांक शंतनू कांबळे, द्वितीय सिम्मी खाडे, तृतीय क्रमांक संबोधी कुंभारे हिने पटकाविला.
उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक प्रतीक्षा कावळे,द्वितीय प्राची वेट्टी ,तृतीय क्रमांक अरशीमा सिद्दीकी हिने पटकाविला.
स्पर्धेचे परीक्षण श्रीमती वैशाली हेपट, संतोष मुंगुले,प्रा नरेंद्र हेपट यांनी केले.
याप्रसंगी हिंदी दिवस निमित्ताने घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके अतिथी च्या हस्ते वितरित करण्यात आली, हस्तलिखिते चे प्रकाशन करण्यात आले,तसेच तालुका व जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी विशाल पिंपळकर याचा गौरव करण्यात आला, कार्यक्रमाचे संचालन प्रा बाळू उमरे व श्वेतलाना टिपले यांनी केले तर आभार प्रदर्शन वामन टेकाम यांनी केले,
याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.