शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी अतुल भगत

लोकदर्शन👉.विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 30 ऑगस्ट शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने भाजपसोबत सरकार स्थापन केले. खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावादेखील शिंदे करीत आहेत. शिंदे गटासोबत गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्याचे काम राज्यभर सुरू आहे.रायगड जिल्ह्यातील उरण पनवेलमधील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शिंदे गटात मोठ्या प्रमाणात प्रवेश केला होता.शिंदे गटात गेलेल्या रामदास शेवाळे व प्रथमेश सोमण, अतुल भगत यांची महत्त्वाच्या पदांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती केली आहे.

रायगड जिल्ह्यात नव्याने मोर्चेबांधणीचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतले असून राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबई येथील रत्नसिंधू बंगल्यावर पनवेल व उरण जिल्ह्याच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना पदाचे लेखी पत्र देऊन पदाधिकाऱ्यांना मोर्चेबांधणीचे काम सुरू करण्यास सांगितले.यावेळी अतुल भगत यांना रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख पद देण्यात आले तर रामदास शेवाळे यांना पनवेल जिल्ह्याचा संपर्क नेता, पनवेलच्या महानगरपालिका क्षेत्रासाठी ऍड.प्रथमेश सोमण यांना पदभार पक्षाने सोपविला आहे. रूपेश ठोंबरे यांच्याकडे पक्षाने तालुकाप्रमुख ही जबाबदारी दिली असून माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य परेश पाटील यांना पनवेल विधानसभा मतदार संघ परिसरासाठी उपजिल्हा प्रमुख नेमण्यात आले आहे. पनवेल विधानसभेची जबाबदारी परेश पाटील यांना देण्यात आली आहे. मुंबई येथील पदवाटप करण्याच्या कार्यक्रमावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे शिंदे गटाचे सचिव संजय मोरे, आमदार महेंद्र थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांसह रायगड उपजिल्हा प्रमुख पदी अतुल भगत यांची निवड केल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, मित्र परिवार, हीतचिंतकांनी अतुल भगत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पनवेल महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गट स्थानिक पातळीवर भाजपसोबत युती करण्याची शक्यता आहे. पालिकेत शिवसेनेचा एकही नगरसेवक मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आला नव्हता. त्यामुळे शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.पुढील निवडणुका लक्षात घेऊन शिंदे गट अधिक जोमाने कामाला लागला असल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात बघायवयास मिळत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *