रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या स्वप्नाली मगरने पटकावले विद्यापीठाचे सुवर्ण पदक

लोकदर्शन 👉 राहुल खरात

उस्मानाबाद (प्रतिनिधी)दि.२३येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील वाणिज्य विभागात शिकत असलेली स्वप्नाली मगर हिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबादच्या शै.वर्ष (२०२०—२०२१) च्या एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या विद्यापीठ परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.ती वाणिच्य शाखेत विद्यापीठात सर्वप्रथम आली असून विद्यापीठात सुवर्ण पदकाची मानकरी ठरली असल्याचे पञ विद्यापीठाकडून महाविद्यालयाला नुकतेच प्राप्त झाले आहे. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या कडून तिचे आणि वाणिज्य विभागाचे अभिनंदन करण्यात आले.रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची सुवर्णपदकाची परंपरा स्वप्नालीने कायम ठेवली असून अशीच परंपरा पुढे कायम राहावी अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
या विद्यार्थिनीला प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख वाणिज्य विभागातील प्रा.नारायण सकटे,प्रा.बालाजी नगरे, डॉ.अवधुत नवले, डॉ. अमर निंबाळकर, प्रा.सुप्रिया शेटे,प्रा.बालाजी क—हाडे,प्रा.राजा जगताप, त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन लाभले. स्वप्नाली मगर या विद्यार्थिनीने सुवर्ण पदक पटकाऊन महाविद्यालय व उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव विद्यापीठात केल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी—विद्यार्थिनींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
तिच्या यशाबद्दल महाविद्यालय व उस्मानाबाद परिसरात सर्वञ
कौतुक होत आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *