दीक्षा शिंदे नासा पॅनलिस्ट काय खरं , काय खोटं …..

लोकदर्शन 👉

 

गेल्या 19 ऑगस्ष्ट रोजी ए ऐन आय या न्यूज एजेंसीने एक बातमी दिली..औरंगाबाद येथील दीक्षा शिंदे या 14 वर्षाच्या विद्यार्थिनीला नासाने एम एस आय फेलोशिप च्या व्हर्च्युअल पॅनल वर पैनलिस्ट स्वरूपात नियुक्ती केल्याचे बातमीत म्हटले अन अवघ्या महाराष्ट्रात तिच्यावर अभिनंदनाचा पाऊस पडला ..ती मागासवर्गीय असल्यामुळे स्वनामधान्य मागासवर्गीय संघटनांनी तिला डोक्यावर घेतले अन आम्हीही तिचे नागपुरात राहून अभिनंदन केले ..अभिनंदनाचा महापूर काठोकाठ वाहत जगभर प्रवाहित झाला अन झोपलेले नासा या बातमीने जागे झाले..मी दिक्षाचे केलेले अभिनंदन वाया तर गेले नाही ना म्हणून फॅक्ट चेक धुंडाळले अन माझ्या हाती या बातमीचा सातबारा आला ..तो वाचून मलाही कमालीचा धक्का बसला..
काय म्हणाले नासा..
या बातमीवर स्पष्ट करतांना नासा म्हणाले की ,मे 2021 रोजी आम्ही थर्ड पार्टी च्या माध्यमातून एक्सपर्ट पैनॅलिस्ट साठी अर्ज मागविले ..जेणे करून फेलोशिपसाठी येणाऱ्या अर्जाचे वर्गीकरण सुयोग्यरित्या होऊ शकेल ..यात दीक्षा शिंदेच्या अर्जात मात्र चुकीची माहिती नोंदविली होती असा नासाचा आक्षेप आहे ..बाकी इतर अर्जावर आमचे काम सुरू आहे असे नासा म्हणाले .दीक्षा आमच्या सोबत जोडली गेली नाही अन आम्ही तिला कुठलीही फेलोशिप दिली नाही असे नासाने स्पस्ट करून तिच्या कथित फेलोशिपला पंक्चर करून टाकले ..वास्तविक गाजावाजा झालेली तिची कथित फेलोशिप अमेरिकन नागरिकांनाच मिळते ..पण फेकू न्यूज एजन्सीने तीला भारतात फेकम करून टाकले ..दिक्षाचा कुठलाच पेपर नासाने स्वीकारलाच नाही ..आता हा दोष दीक्षाचा नसावा ..अशा फेलोशिपसाठी मी नासाकडे अर्ज केला असे तिने न्यूज एजन्सी च्या पत्रकाराला सांगितले असावे अन त्या उतावीळ दादाने फेलोशिप मिळाल्याची बातमी हवेत उडवून दिली असावी.
****
ज्येष्ठ पत्रकार धनराज गावंडे यांची फेसबुक पोस्ट

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *