भटक्या विमुक्तांचा- गोपाल(भरवाड) समाजातील त्या 72 मुलांना शाळेत प्रवेश कधी मिळणार?

लोकदर्शन 👉 महेश गिरी ( नागपुर)


🔶*भटके-विमुक्त हक्क परीषदेची त तात्काळ प्रवेश देण्याची मागणी अन्यथा आंदोलन करु अशी सुचना*
*कालडोंगरी बेडयातील मुले देताहेत लढा शाळांचा मात्र प्रवेशास नकार*

नागपूर/कामठी– गोपाल (भरवाड) समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री रामा जोगराणा यांनी भटके-विमुक्त हक्क परीषद चे विदर्भ विभाग अध्यक्ष श्री महेश गिरी सर यांना कालडोंगरी येथील भटक्या -विमुक्त समाजाचा गोपाल समाजातील आमच्या ह्या कुटुंबातील एकुण अंदाजे 72 मुलांना तेथील स्थानीक जि.प.शाळा प्रवेश देत नाहीत कारण काय तर ते भटके आहेत असे असुनही पालक व विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी व आपल्या मुलभुत अधिकारासाठी या ना दारी फिरत आहे असे सांगितले असे समझताच भटके-विमुक्त हक्क परीषद चे पदाधिकारी व श्री रामा जोगराणा हे कालडोंगरी येथील त्यांचा वस्ती ला भेट दिली तेथे खरी वास्तवता दिसली मुले शाळेत जाण्यास व शिक्षण घेण्यास आतुरतेने वाट पाहत आहेत व पालकांसोबतचा चचॅत असे समजले की आम्ही शिकलो नसलो तरी आमची पुढील पिढी शिकायला हवी यासाठी आम्ही ही धडपड करतोय पण स्थानीक जिल्हा परीषद शाळा व संबंधित व्यवस्थापन समिती शाळेत प्रवेश घेण्यास सक्त मनाई करत आहेत

मग लगेचच चचाॅ करुन व खरी वास्तवीक परीस्थिती पाहून भटके-विमुक्त हक्क परीषद चे पदाधिकारी व श्री जोगराणा व संबंधित पालक थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचली व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी(सी.ई.ओ.) नागपूर यांना संबंधित बाबीची माहिती दिली व याविषयावर तात्काळ कार्यवाही करुन त्या भटके-विमुक्तांचा मुलांना शाळेत प्रवेश दिला पाहिजे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन सुरू करु अशी धमकी वजा विनंती केली नंतर सी.ई.ओ.साहेब यांनी त्वरीत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना फोन केला व त्वरीत कार्यवाही करण्यास सांगितले तेव्हाच शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री चिंतामण वंजारी साहेब यांनी भटके-विमुक्तांचा गोपाल समाजाचा त्या वस्तीत त्वरीत भेट दिली व येत्या दिवसात त्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल किंवा पयाय म्हणुन वस्तीशाळा सुरु करु अशी ग्वाही दिली

तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल भटके-विमुक्त हक्क परीषद चे विदर्भ विभाग अध्यक्ष श्री महेश गिरी सर यांनी त्यांचे आभार मानले प्रसंगी उपस्थित श्री प्रदिपजी पुरी(सचिव नागपूर – भ.वि.हक्क परीषद) ,श्री रामा जोगराणा, श्री वेला आमरा साठिया, श्री रणोगगंदा साठीया, श्री रामामीठा साठीया, समस्त पालक व विद्यार्थी तसेच गोपाल समाज महिला उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *