शिवसेना नवीन शेवा शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,वह्या वाटप व जेष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप कार्यक्रम

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

*⭕माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम संपन्न*

उरण दि 22 ऑगस्ट
सोमवार दिनाकं 22 ऑगस्ट 2022 रोजी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करत वाटचाल करणाऱ्या शिवसेनेच्या नवीन शेवा शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,वह्या वाटप व जेष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप कार्यक्रम माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. शैक्षणिक कार्यक्रमामध्ये 10 वी, 12 वी व विविध विभागातील पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व विध्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले तर सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील यांच्या सौजन्याने जेष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आपले मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शिवसेना नवीन शेवा शाखेच्या माध्यमातून गेली पस्तीस वर्ष हा कार्यक्रम केला जातो, त्याबद्दल सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करतो व पुढच्या चार महिन्यात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सर्वांनी सज्ज राहून ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन केले.तर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, महिला उपजिल्हा संघटिका ममता पाटील, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, उपतालुका प्रमुख कमळाकर पाटील, शिक्षक सेनेचे नरेश मोकाशी आदींची भाषणे झाली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपतालुका संघटक के एम घरत यांनी केले.

या कार्यक्रमास उरण पंचायत समिती उपसभापती हिराजी घरत, उपतालुकाप्रमुख प्रदिप ठाकूर, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर,भा वि सेनेचे जिल्हा संघटक रोहिदास पाटील, विभागप्रमुख संदेश पाटील, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, तालुका संघटिका श्रीमती सुजाता गायकवाड, श्रीमती वासंती म्हात्रे, लीलावती भोईर, माध्यमीक शाळेचे मुख्याध्यापक संतोष म्हात्रे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष म्हात्रे गुरुजी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख शैलेश भोईर, उपशाखाप्रमुख सुरेश पाटील, अशोक म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, निलेश घरत, परशुराम ठाकूर, महिला आघाडी शाखाप्रमुख वैशाली सुतार, मयुरी घरत, सुरेखा भोईर शुभांगी भोईर,सुनंदा भोईर, वैशाली म्हात्रे, मनिषा घरत व शिवसैनिक यांनी मेहनत घेतली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *