आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते १०० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण.

*आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते १०० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण.*

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा(ता.प्र) :– आज दिनांक १५ आॅगस्ट रोजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सकाळी ९ : ३० वाजता ना नगर परिषद राजुरा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नुकतेच उभारण्यात आलेल्या १०० फुट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरिष गाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, स्वामी येरोलवर, माजी उपनगरध्यक्ष सुनिल देशपांडे, रंजन लांडे, कुंदाताई जेणेकर, माजी नगरसेवक गजानन भटारकर, आनंद दासरी, संध्या चांदेकर, सय्यद सकावत अली, संतोष मेश्राम यासह नगर पालिका प्रशासन अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *