भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात ध्वजारोहण.

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

*देशभक्तीची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या हृदयात अखंड तेवत राहो – देवराव भोंगळे*

सोमवार, दि. १५ ऑगस्ट.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी घुग्घुस येथील मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
ध्वजारोहणानंतर जिल्हाध्यक्ष भोंगळे यांनी उपस्थितांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन १३ ऑगस्ट पासून राबविण्यात येत असलेल्या “हर घर तिरंगा” अभियानाला शहरवासीयांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि उत्स्फूर्तपणे घरोघरी तिरंगा लावला. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

आजादी का अमृत महोत्सव अभियानातंर्गत भाजयुमोतर्फे शहरातील शाळांमध्ये घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत विजयी ठरलेल्या विजेत्यांना प्रशस्तिपत्रक व पारितोषिक देण्यात आले. यासोबतच नगरपरिषदेचे सेवा निवृत्त कर्मचारी रामचंद्र वनकर यांना मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील दिव्यांग सायकल भेट देण्यात आली.

याप्रसंगी बोलताना, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सोहळा आज अभूतपूर्व उत्साहात संपूर्ण देशभर साजरा होत आहे. हे स्वातंत्र्य ज्यांच्या बलिदानामुळे मिळाले आणि ज्यांनी ते स्वातंत्र्य अबाधित रहावे म्हणून बलिदान दिले, अशा सर्वांचे आज मी स्मरण करतो, त्यांना नमन करतो आणि देशभक्तीची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या हृदयात अखंड तेवत राहो असं वरदान स्वातंत्र्यदेवतेला मागतो. यासोबतच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनाला घुग्घुस शहरातून उत्तम प्रतिसाद देत “हर घर तिरंगा” अभियानात आपण सहभागी झालात, जवळपास सहा हजारांच्यावर लोकांनी घरी तिरंगा ध्वज फडकला. हे निश्चीतच अभिमानास्पद आहे.

शहरामध्ये जवळपास साडेसहा हजार तिरंगी ध्वज घरोघरी पोहोचविणे, शहरातून भव्य तिरंगा बाईक रॅली आणि सामान्यज्ञान स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अमोल थेरे, गुड्डू तिवारी, विनोद जंजर्ला, शरद गेडाम, नितीन काळे, हेमंतकुमार, असगर खान, कोमल ठाकरे व बोबडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला.

यावेळी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपचे निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, चिन्नाजी नलभोगा, सिनू इसारप, साजन गोहने, वैशाली ढवस, सुचिता लुटे, नंदा कांबळे, लक्ष्मी नलभोगा, पूजा दुर्गम, राजेश मोरपाका, बबलू सातपुते, सचिन कोंडावार, प्रवीण सोदारी, अनंता बहादे, संजय भोंगळे, हेमराज बोंबले, अर्चनाताई भोंगळे, किरणताई बोढे, प्रेमलाल पारधी, मधुकर मालेकर, मंदेश्वर पेंदोर, विक्की सारसर, मल्लेश बल्ला, रवी चुने, स्वामी जंगम, हेमंत पाझारे, निरंजन नगराळे, दिलीप कांबळे, तुलसीदास ढवस, दिनेश बांगडे, मधुकर धांडे, सुनील राम, भारत साळवे, धनराज पारखी, सुरेंद्र भोंगळे, सुरेंद्र जोगी, सुनीता पाटील, सुनंदा लिहीतकर यांचेसह शालेय विद्यार्थी तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *