लखमापूर येथे शालेय मंत्रिमंडळाची निवड

 

लोकदर्शन👉.मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे 1 ऑगस्ट ला
लोकशाही पद्धतीने शालेय मंत्री मंडळाची गुप्त मतदान नुसार निवड करण्यात आली.
बाल वयातच मुलांना लोकशाही बद्दल अधिकची माहिती व्हावी व लोकशाही वाचवण्यासाठी गुप्त मतदान पद्धतीने निवड कशा प्रकारे केल्या जाते याचे धडे देण्यासाठी सदरचा उपक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे गुप्त मतदान पद्धत वापरून मंत्री मंडळ निवड शाळेमध्ये करण्यात आली…
सदर प्रक्रिया राबवत असताना निवडणूक अधिकारी म्हणून मतदान अधिकारी केंद्राध्यक्ष म्हणून शालेतीलच मुलांनी अगदी चोख पने काम पाहिले.
यादीत नाव शोधणे म्हणजे हजेरीत नाव पाहने , समोरची प्रक्रिया बोटाला शाही लावणे दुबार मतदान कोणी करू नये म्हणून ,तिसरा व्यक्ती त्याला या व्यक्तीला मतदान करायचा आहे त्याच्यासाठी एक चिठ्ठी देणे आणि समोरच्या टेबलवर जाऊन मतदाराने आवडत्या व्यक्तीचं नाव त्या चिठीवर लिहणे व मतदान पेटीमध्ये टाकने .
निवडणूक अधिकारी म्हणून नेमलेल्या मुलांनी मतमोजणी केली. व सदरच्या मंत्रिमंडळाची पूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण करून सर्व पदाची नेमणूक करण्यात आली.
*शालेय मुख्यमंत्री* म्हणून कु. योगिता भारत ढाकणे
*शालेय उप मुख्यमंत्री* लक्ष पारखी
*शालेय शिक्षणमंत्री*-यश चौधरी
*शालेय क्रिडामंत्री*-प्रतिक बुऱ्हाण
*शालेय सांस्कृतीक मंत्री*-मयुर पेंदोर(5to 7)
कु. आस्था मालेकर(1to4)
*शालेय शा.पो.आहार मंत्री* -यश लांडे
*शालेय पाणीपुरवठा मंत्री*-बजरंग कोडापे
*शालेय पर्यावरण मंत्री* -करण पिंपळशेंडे(5to7)
अनुज पिंपळशेंडे(1to4)
*शालेय सहल मंत्री*-जान्हवी भोजेकर व वेदान भोयर.
सदर उपक्रम शाळेतील शिक्षक श्री बि.एच.बूच्चे,एस.एम.आलम, कु.एम.यु. उरकुडे (मुख्याध्यापीका)कु.एम. बी.चटप, कु.एम.एस.देशमुख,श्री एस. टी.चव्हाण,श्री.के.जी. अलावत यांच्या उपस्थितीत आणि सहभागातून घेण्यात आला.
,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *