आगरी सेनेचा 36 वा वर्धापन दिन सोहळ्याचे सोमवार दि 1 आँगस्ट रोजी गडकरी रंगायतन ठाणे येथे आयोजन.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि. 31 जुलै आगरी व बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी, आगरी व बहुजन समाजाच्या प्रत्येक समस्येवर आवाज उठविणारी संघटना म्हणून आगरी सेना सर्वांना सुपरिचित आहे.आगरी व बहुजन समाजाच्या अस्मितेसाठी संघर्ष करणाऱ्या आगरी सेनेचा 36 वा वर्धापन दिन सोहळा आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांच्या अध्यक्षतेखाली व आगरी सेना नेते प्रदीप साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि 1ऑगस्ट 2022 रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे दुपारी 3 वाजता येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

सकाळी 9 वाजता झेंडावंदन आगरी सेना मुख्य कार्यालय कळवा, दुपारी 2 वाजता कार व बाईक रॅली, दुपारी 3 वाजता 36 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे. वर्धापन दिन सोहळा समारंभा नंतर, परीनिताज प्रस्तुत महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा जपणारा एक अनोखा अविष्कार ‘गर्जतो मराठी आवाज’ या कार्यक्रमाचे आयोजन असे दिवसभरातील कार्यक्रम असून या सोहळ्यास आगरी सेना, युवा आगरी सेना, महिला आघाडी , आगरी सेना विद्यार्थी परिषद,कामगार एकता , वाहतूक संघटना या आगरी सेनेशी संलग्नित विविध संघटना तसेच ओ.बी.सी समाजाचे मान्यवर नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम व वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडणार असून नागरिकांनी, आगारी सेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, समाज बांधवानी 36 व्या वर्धापन दिन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आगरी सेनेच्या वतीने युवा आगरी सेनेचे उरण तालुकाध्यक्ष कु.देवेंद्र वसंत तांडेल यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *