कळमना येथे भारतीय स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण. सरपंच वाढई यांच्या पुढाकारातून कळमना येथे साकारतोय आॅक्सिजन पार्क.

लोकदर्शन👉मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे भारतीय स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त ग्रामपंचायत कळमना
येथे वृक्षारोपण करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर फळझाडे लावून येथे आक्सीजन पार्क तयार करण्याचा संकल्प सरपंच नंदकिशोर वाढई यांनी घेतला असून गावपातळीवरील चंद्रपूर जिल्ह्य़ातील जवळपास अशा प्रकारची ही पहिलीच फळबाग ही कळमना येथे आकाराला येत असल्याचे बोलले जात आहे. या प्रसंगी मार्गदर्शन करताना कळमनाचे सरपंच काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सवानिमित्त फळबाग लावण्याचा उपक्रम कळमना गावांमध्ये आम्ही घेतला. यात नारळ, चिकू, फणस, पेरू, लिंबू, कवट आवळा, जांभूळ या विविध फळाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले ही बाब अभिमानास्पद आहे. कळमना येथे लावलेल्या फळबागेचे योग्य प्रकारे जतन व संगोपन करून या फळाचा लाभ पुढच्या पिढीला नक्कीच होईल तेव्हा समस्त गावकर्‍यांनी या फळबागेचे संरक्षण व संवर्धनासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी विशेष अतिथी राजुरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, भोयर साहेब, कुंभारे साहेब अंबुजा फाउंडेशन उपरवाही, सुभाष बोबडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी उपरवाही, चंद्रकांत धानोरकर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, पवन कुनाडकर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अंबुजा फाउंडेशन उपरवाही, प्रदीप बोबडे, सिद्धेश्वर जम्पलवार, उपसरपंच कौशल्य कावडे, ग्रा प सदस्य रंजना पिंगे, सुनीता उमाटे, दीपक झाडे, साईनाथ पिंपळशेंडे, प्रियंका गेडाम, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजणे, ग्रामसेवक नारनवरे, ज्येष्ठ नागरिक उद्धव पाटील आश्वले, कवडू पाटील पिंगे, लटारी पाटील बल्की, पुंडलिक पाटील पिंगे, मुख्याध्यापक धानकुटे सर, गोखरे मॅडम, दुधे मॅडम, महादेवजी वाढई, मदन वाढई, देवाजी पाटील चापले, महादेव आंबीलकर, कृषी सहाय्यक पुरणपट्टीवार, शामराव चापले, देवानंद अबिलकर, पुरुषोत्तम आत्राम, मारुती वाढई, लक्ष्मण आत्राम, नथू वसाके, श्रावण गेडाम, विठ्ठल नागोसे, सुनील मेश्राम, लता सिरसागर, पंडित गेडाम यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमनाचे विद्यार्थी आणि समस्त गावकरी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *