अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन च्या वतीने बीबी येथे बालवाडी चे उद्घाटन संपन्न

 

लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
मुलांना शाळेचे वळण लागावे तसेच त्यांना योग्य वाढ होण्यासाठी पोष्टीक आहार मिळावा याकरिता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर ने बीबी येथील कोविड मुळे बंद असलेली बालवाडी पुन्हा सुरू केली आहे.

बालवाडी चे उद्घाटन सुधा श्रीराम मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिव्या शर्मा मॅडम, पल्लवी घोष मॅडम यांची उपस्थिती होती.

यावेळेस मा सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. सर्व मुलांना बिस्किट व चिक्की चे वाटप करण्यात आले व सर्व मुलांना सुधा श्रीराम मॅडम यांच्या द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमात सी.एस.आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, डॉ गोदावरी नवलानी, संजय ठाकरे, देविदास मांदळे व बालवाडी शिक्षिका विद्या कारवटकर , हेल्पर रजीया शेख यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here