साई भक्त गोदावरी भोईर यांचे दुःखद निधन

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 27.जुलैनवघर गावातील वयोवृद्ध कै. गोदावरी नामदेव भोईर ह्यांचे सोमवार दि. 25 /7/2022 रोजी नव्वद व्या वर्षी वृद्धापकाळाने नवघर येथील राहत्या घरी निधन झाले आहे .त्या निस्सिम साई भक्त कै नामदेव नागु भोईर ह्यांच्या पत्नी होत्या .त्या सुद्धा साई भक्त होत्या. त्यांनी हयातीमध्ये संपूर्ण भारता मधील देवदर्शन, तिर्थक्षेत्र यात्रा केल्या होत्या.त्यांच्या मागे मोहन, जगदीश, गणेश तिन मुलगे आणि दोन सुना, नंदिनी, सुनिता ह्या दोन मुली आणि दोन जावई अशी पाच मुलं,त्यांना चार नातू, अकरा नाती, सात पणतू, चार पणती असा त्यांचा मोठा परिवार आहे.त्यांचा दहाव्याचा कार्यक्रम बुधवार दिनांक 3 ऑगस्ट 2022 श्री माणकेश्वर क्षेत्र उरण येथे होणार आहे.बारावे उत्तरकार्य शुक्रवार दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी राहत्या घरी नवघर येथे होईल. त्यांच्या अंत्ययात्रेस गावातील मंडळी आणि त्यांचे नातेवाईक परिवार असा बराच समुदाय होता
त्यांच्या अंत्ययात्रेसाठी शिवसेना नेते दिनेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उद्योजक विकास भोईर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जगदिश बुवा भोईर नवघर,लक्ष्मण बुवा भोईर कुंडेगाव, गुरूनाथ बुवा भोईर आणि इतर सहकारी ह्या सर्वांनी भजन सेवा सादर केली.नवघर गावातील स्मशान भूमीत गोदावरी भोईर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.गोदावरी भोईर यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण नवघर ग्रामस्थांवर, भोईर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here