आषाढी एकादशी निमित्त आदिवासी बांधवाना ब्लॅकेट अन्नधान्य व ज्यूसचे वाटप

उरण : (विठ्ठल ममताबादे) केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वि , उज्वल सृष्टी फाउंडेशन, श्री समर्थ कृपा सखी सहाय्यता संस्था उरण व मित्र परिवार उरण यांच्या संयुक्त विदयमाने उरण तालुक्यातील रानसई आदिवासी वाडी केळ्याचा मळा येथे आदिवासी बांधवांना ब्लॅकेट, अन्नधान्य व ज्यूसचे वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या उपक्रमावेळी महाराष्ट्रभूषण राजू मुंबईकर संस्थापक केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था, स्नेहल पालकर अध्यक्ष कॉन संस्था, संदेश घरत उपाध्यक्ष कॉन संस्था, विघ्नेश भालेराव अध्यक्ष उज्ज्वल सृष्टी फाउंडेशन नवी मुंबई,संपेश पाटील अध्यक्ष मित्र परिवार, रोशन पाटील उपाध्यक्ष मित्र परिवार,कांती म्हात्रे, नितेश मुंबईकर, सुरेंद्र पाटील,सुनील वर्तक प्रसिद्ध निवेदक, भूमी सिंग, निकिता पाटील अध्यक्ष आधार संस्था,नवनीत पाटील अध्यक्ष गोल्डन जुबली संस्था,रचित म्हात्रे, उज्ज्वल सृष्टी फाउंडेशनचे पदाधिकारी ओम उपाध्ये,भूमिका सिंग,निकिता पाटील,काजल म्हात्रे,साहिल म्हात्रे,केल्याचा माळ येथील आदिवासी बांधव उपस्थित होते.यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांनी आयोजकांचे आभार मानले. अन्नधान्य, ब्लॅंकेट, ज्यूस मिळाल्याने आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here