भाजपचा राष्ट्रवाद की दहशतवाद?’ चंद्रपूर युवक काँग्रेसची फलकबाजी

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

चंद्रपूर / राजुरा :– उदयपुर दर्जी कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपींचे फलक चंद्रपूर युवक काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर येथे लावण्यात आले आहेत. या फलकांमध्ये उदयपूरमधून अटक करण्यात आलेला दहशतवादी रियाज आणि जम्मूमधून अटक केलेला दहशतवादी तालिब यांचे संबंध भाजपशी दिसत आहेत. बॅनर लावण्यासोबतच हा भाजपचा राष्ट्रवाद आहे की दहशतवाद ? असा सवाल चंद्रपूर युवक काँग्रेसने भाजप सरकारला केला आहे. अशा आशयाचे फलक चंद्रपूर शहरात मुख्य ठिकाणी लावले आहेत. भाजपचे चारित्र्य आणि चेहरा उघड होत आहे, राष्ट्रवादाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपसाठी ही लाजिरवाणी बाब असून, भाजपचा खरा मुखवटा जनते समोर येणे गरजेचे आहे असे मत चंद्रपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी व्यक्त केले आहे.
प्रखर राष्ट्रवाद उभा करून महागाई, बेरोजगारी व जनसामान्यांच्या मुलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यापासुन पळ काढायचा असा काहीसा पावित्रा भाजपने एकंदरीत संपूर्ण देशात सुरू केला आहे तर दुसरीकडे याच पक्षाशी संबंधित सध्या सुरू असलेल्या प्रकरणात दिसून येत आहेत ही चक्क जनतेची दिशाभूल आहे. भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद की दहशतवाद ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *